Lightning Strikes : राजस्थानच्या जयपूरमध्ये काळ बनून कोसळणाऱ्या वीजेचा कडकडाट कॅमेऱ्यात कैद
आमेर किल्ल्यावर 11 जणांचा जीव घेणारी वीज कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काल रात्री आमेर किल्ल्याच्या टॉवरवर सेल्फी काढण्यासाठी काही जण चढले होते. नेमकी त्याचवेळी वीज कोसळली आणि टॉवरवर चढलेले वीजेच्या धक्क्यानं किल्ल्यालगतच्या झाडाझुडपात फेकले गेले. राजस्थानमध्ये काल रात्री वीज कोसळून एकूण 20 जणांचा मृत्यू झालाय. ज्यात कोटामध्य मृत्यू झालेल्या 4 जणांचा, तर धौलपूरमधल्या तिघांचा समावेश आहे.. मृत्यू झालेल्यांच्यान नातेवाईकांना पाच पाच लाखांची मदत राजस्थान सरकारनं जाहीर केली आहे..