Legal Age of Marriage for Women : मुलींच्या लग्नासाठी वयाची अट वदलणार ? सरकार दरबारी हालचाली सुरू

Continues below advertisement

बातमी मुलींसाठी आणि मुलींच्या पालकांसाठी अत्यंत महत्वाची. मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अधिवेशनात हे विधेयक आणणार आहे. सोमवारी संसदेत विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आलीए.. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram