Lata Mangeshkar Funeral : राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola