Coronavirus | 'लांसेट'ने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनबाबत अभ्यास मागे घेतला

Continues below advertisement
लांसेट या प्रतिष्ठीत सायन्स मॅगझिनने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन बाबतचा यापूर्वी जाहीर केलेला अभ्यास मागे घेतला आहे. आपला अभ्यास चुकीचा असल्याचे लांसेटने मानले आहे. लांसेटच्या 197 वर्षीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. त्यामुळे लांसेटच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. लांसेटने काल याबाबत एक निवेदनात जारी केले आहे. या निवेदनात संशोधनातले तपशील देण्यात आले आहेत. संबंधित संशोधन 22 मे रोजी प्रकाशित झाले होते. त्यात 6 खंडांतील रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोरोनाच्या 96 हजार रुग्णांच्या डेटाचे विश्लेषण केले गेले होते. एचसीक्यू किंवा क्लोरोक्वीनच्या वापरामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे, काही रुग्णांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये बदल झाल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु या संशोधनातले अनेक तपशील जुळत नसल्याने 100 हून अधिक वैज्ञानिकांनी लांसेटकडे आक्षेप नोंदवले होते. त्यावर लांसेटनी दुसरा अभ्यासगट नियुक्त केला होता. या गटाच्या अहवालानंतर लांसेटनी आपला अभ्यास परत घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram