Lal Krishna Advani on Babri verdict | निकाल आल्यावर लालकृष्ण आडवाणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Continues below advertisement

1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे.
कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आडवाणी यांनी म्हटलं आहे की, ''आजचा हा निकाल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही सर्वजण यामुळं अत्यंत आनंदी आहोत. ज्यावेळी निकाल ऐकला त्यावेळी जय श्रीराम म्हणून आम्ही या निर्णयाचं स्वागत केलं" असं आडवाणींनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram