Lakhimpur Kheri violence : लखीमपूर हिंसाचाराला हिंदू विरुद्ध शीख युद्धात बदलण्याचा डाव :Varun Gandhi

भाजपचे खासदार वरुण गांधी गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि आता लखीमपूर हिंसाचारावरुन टीका करतायत. आता पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून वरुण गांधी यांनी गंभीर आरोप केलाय. लखीमपूर हिंसाचाराला हिंदू विरुद्ध शीख युद्धात बदलण्याचा डाव आहे असा आरोप वरुण गांधी यांनी केलाय. क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवू नये असंही वरुण गांधी यांनी म्हटलंय. वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिलेले नाही. असं असतानाही वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांबाबतची आपली भूमिका कायम ठेवलीय. ((

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola