Farmers Tractor Rally | सिंघू सीमेवरील हिंसाचारात लक्खा सिधानाचा हात?
Continues below advertisement
दिल्लीत (Republic Day 2021) दिनाच्या दिवशी कृषी कायद्याच्या निषेधार्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढण्याचा निर्णय़ घेतला. परेड निघाली, पण शांततापूर्ण मार्गाचा कुठेही अवलंब केला गेला नाही. कडेकोट सुरक्षा असतानाही आंदोलक शेतकऱ्यांनी सिंघु आणि गाझीपूर सीमेवरुन दिल्लीत प्रवेश केला. परंतु आंदोलक नियोजित मार्गावरुन हटले आणि ही रॅली हिंसक बनली. परिणामी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, लाठीमार करावा लागला. दिल्लीत पोलीस, सुरक्षा यंत्रणा आणि शेतकऱ्यांमध्ये एकच धुमश्चक्री पाहायला मिळाली. दगडफेक, धक्काबुक्की असंच एकंदर चित्र या रॅलीदरम्यान पाहायला मिळालं.
Continues below advertisement
Tags :
Lakhha Sidhani Delhi Protest Violence Farmers Tractor Rally Red Fort Farmers Tractor Rally Republic Day 2021 Farmers Protest