भारत-चीन सीमावाद | चर्चेतून मार्ग काढण्यावर एकमत, आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक
Continues below advertisement
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलिकडे हद्दीत चीनी सैन्याच्या लष्करी हालचाली वाढल्याने भारत आणि चीनदरम्यान तनाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही देशांनी आपल्यातील मतभेदांना वादामध्ये रुपांतरीत न करता चर्चेतून मार्ग काढण्यावर भर दिला आहे. दोन्ही देशांच्या संवेदनशील बाबी, चिंता आणि अपेक्षांचा सन्मान करत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यावर दोन्ही देश तयार झाले आहेत. आज भारत आणि चीनच्या लष्काराचे कोअर कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची याबाबत एक बैठक होणार आहे. ही बैठक चीनच्या मोलडो-चुशूल स्थित बीपीएम हटमध्ये होणार आहे. भारताकडून या बैठकीचं नेतृत्व लेफ्टनेंट जनरल हरिंदर सिंह करणार आहेत.
Continues below advertisement