Andhra Bus Fire: Kurnool मध्ये खाजगी बसला भीषण आग, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
Continues below advertisement
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) कर्नूल (Kurnool) जिल्ह्यात एक खाजगी बसला (Private Bus) आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 'या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.' हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही बस मोटारसायकलला धडकल्यानंतर पेटली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४२ प्रवासी होते. आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी खिडक्या तोडून बाहेर उडी मारली, तर अनेक जण आत अडकले. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement