Kumar Ketkar: मविआ सरकार पाडण्यासाठी भाजप आता जोमाने प्रयत्न करेल - केतकर ABP Majha

उत्तर प्रदेशसह चार राज्यांत मोठा विजय मिळवल्यानं भाजप महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पाडण्यासाठी जोमानं प्रयत्न करेल असं काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी म्हटलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा प्रयत्न आधीपासूनच सुरु आहे. पण त्यात यश आलं नाही तर राष्ट्रपती राजवट लावून मध्यावधी निवडणूक घेतली जाईल, अशी शक्यता केतकर यांनी वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतरच असं करण्याची भाजपची रणनीती होती. पण तिथं भाजपचा पराभव झाल्यानं त्यावेळी राष्ट्रपती राजवटीचे प्रयत्न थांबले, असंही केतकर म्हणालेत..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola