Kishtwar Cloudburst | माचेल माता यात्रेच्या मार्गावर ढगफुटी, बचाव कार्य सुरू
जम्मूच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोती भागात ढगफुटी झाली आहे. माचेल माता यात्रेच्या प्रारंभाच्या ठिकाणी अचानक पूर आला आहे. किश्तवाडचे उपायुक्त पंकज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जम्मू विभागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने जम्मूच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा अलर्ट यापूर्वीच जारी केला होता. माचेल माता यात्रेसाठी अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. बचाव कार्य वेगाने सुरू असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.