Khan Sir Case : बिहारमध्ये विद्यार्थ्यांचं आंदेलन शिक्षकांनी भडकवलं? Khan Sir यांच्यावर गुन्हा दाखल

Continues below advertisement

रेल्वेच्या एनटीपीसी परीक्षेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शनं केली आणि त्याला हिंसक वळणही लागलं. या प्रकरणी बिहारमध्ये विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली कोचिंग क्लासचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. खान सरांबरोबरच अन्य कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांविरोधातही विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप करण्यात आलाय. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत क्लासच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भडकावल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कोचिंग क्लासच्या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram