Kerala Monsoon: नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल
Kerala Monsoon: नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल आता सर्वांनाच आनंद देणारी एक बातमी आहे.. नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. यंदा मात्र यासाठी ८ तारीख उजाडावी लागली. तळकोकणात १६ जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.