PC Chacko joins NCP | केरळचे काँग्रेस नेते पी. सी. चाको यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Continues below advertisement
नवी दिल्ली : "सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. सोबतच महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत. केरळमधील काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Kerala Congress Leader P. C. Chacko Joins NCP PC Chacko Kerala Congress Kerala Election