Kedarnath Mandir : केदारनाथ मंदिरातील 125 कोटींचा घोटाळा? पुजारी त्रिवेदी यांचा आरोप काय?
Continues below advertisement
उत्तराखंडमधील केदारनाथ या प्रसिद्ध मंदिरातील गाभाऱ्यात सोन्याऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा आरोप चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथ मंदिराचे पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांनी एका व्हिडीओद्वारे केला आहे. सोन्याचा मुलामा देण्याच्या नावाखाली 125 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर त्रिवेदी यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे बद्री-केदार मंदिर समितीने म्हटलंय.
Continues below advertisement