Vote Scam : 'अवघ्या ८० रुपयांत मत विकले', Karnataka SIT तपासात समोर आले धक्कादायक रेट कार्ड!

Continues below advertisement
कर्नाटकमधील आळंद (Aland) मतदारसंघातील मतदार यादी घोटाळ्याने (Voter List Scam) देशात खळबळ उडवून दिली आहे, या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गंभीर आरोप केले होते. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे की, 'ऐंशी ऐंशी रुपये देऊन सहा हजार मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत'. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. एसआयटीच्या (SIT) चौकशीनुसार, आळंदच्या सायबर सेंटरमधून ६,९९४ नावे हटवण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये देण्यात आले. हटवण्यात आलेली बहुतांश नावे दलित आणि मुस्लिम मतदारांची असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मोहम्मद अशफाक नावाच्या व्यक्तीची २०२३ मध्ये चौकशी करून सोडून देण्यात आले होते आणि तो सध्या दुबईत असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणावर राहुल गांधींनी आवाज उठवल्यानंतर आता एसआयटीच्या अहवालामुळे त्यांच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola