Gokak Waterfall | कर्नाटकातील गोकाक धबधब्यावर काचेचा पूल बांधणार

Continues below advertisement

कर्नाटकातील प्रसिद्ध गोकाकच्या धबधब्यावर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्यात येणार आहे. धबधब्यापासून केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेतील धबधब्याच्या धर्तीवर काचेच्या ब्रीजची निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे.

हिडकल डॅम, गोकाक धबधबा आणि गोडचिनमलकी धबधबा ही तिन्ही पर्यटन स्थळे एकमेकांपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहेत. या तिन्ही पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची योजना जलसंपदा आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या विकास कामांतर्गत गोकाकच्या धाबधब्याजवळ केवळ 20 मीटर अंतरावर अमेरिकेच्या पॅटर्नवर आधारित काचेच्या ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे 350 कोटी रुपयांच्या खर्चातून या क्षेत्राचा विकास करण्याची योजना जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आखली आहे. या कामकाजाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.

गोकाक धबधब्यावर काचेचा ब्रीज, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग आणि मोठ्या प्रमाणात पाणी साठवून हरिद्वारच्या धर्तीवर गंगा पूजन व्यवस्था करण्याची योजना आहे. काचेच्या ब्रीजमुळे गोकाक धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना धबधबा जवळून न्याहाळण्याची संधी मिळणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram