Karnataka Election Results : कर्नाटक निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची कारणं काय?

Continues below advertisement

विधानसभेसाठी कानडी जनतेनं भाजपला नाकारून काँग्रेसवर पसंतीची मोहर उमटवलीय. मॅजिक फिगर ११३ असताना तब्बल १३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. तर पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला अवघ्या ६४ जागा मिळाल्यात. म्हणजेच २०१८च्या तुलनेत भाजपने तब्बल ४० जागा गमावल्यात. कर्नाटकची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडलं होतं. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री यांच्यासह नेते, पदाधिकाऱ्यांची फौज प्रचारात उतरवली होती. तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी जनतेत उतरून प्रचार केला होता. अखेर या कांटे की टक्करमध्ये काँग्रेसनेच बाजी मारली. आणि प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदलाची कर्नाटकची ३९ वर्षांची परंपरा कायम राहिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram