Karnataka CM : कर्नाटक काँग्रेसमध्ये बऱ्याच हालचाली सुरू, कोण होणार कर्नाटकचे मु्ख्यमंत्री?
कर्नाटक काँग्रेसमध्ये बऱ्याच हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. थोड्याच वेळात काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. आणि बैठक स्थळाबाहेर सिद्धरामय्या तसेच डीके शिवकुमार यांच्या समर्थकांची घोषणाबाजी सुरू आहे. सध्या कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अगदी संख्याबळाच्या जोरावर म्हणायचं तर डीके शिवकुमार यांना ६८ आमदारांचा तर सिद्धरामय्या यांच्या पाठिशी ५९ आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंगबाजीदेखील सुरू आहे. दरम्यान, सत्तास्थापनेचा भाग म्हणून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना बंगळुरूत निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलंय.. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह एकूण तीन निरीक्षक आहेत निरीक्षकांच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जातंय