Karnataka : नागाच्या तावडीतून आईनं बाळाला वाचवलं, काळजाचा थरकाप उडवणारी घटना
ई ही शेवटी आईच असते... आपल्या पोटच्या गोळ्यासाठी ती काहीही करु शकते... लेकराला कुठलीही इजा होऊ नये तसंच त्याच्यावर संकट येऊ नये यासाठी आई कशाचीही तमा बाळगत नाही. याचाच प्रत्यय देणारी घटना कर्नाटकच्या गुलबर्गा इथं समोर आलीय... गुलबर्गामध्ये एका आईने पोटच्या गोळ्याला नागाच्या तावडीतून सोडवलंय... एक महिला आपल्या चिमुकल्यासह दरवाज्याच्या पायरी जवळ येते..मात्र त्या दोघांनाही माहिती नसतं की पायरीच्याच बाजूला भला मोठा नाग थांबला होता... नेहमीप्रमाणे चिमुकल्याने पायरीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला...पण त्याचवेळी त्या नागाने फणा काढून चिमुकल्यावर धाव घेतली... क्षणाचाही विलंब न लावता त्या आईने चिमुकल्याला मागे खेचले...त्यामुळे नागाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही... घाबरलेल्या अवस्थेतील दोघेही समोरच्या घराच्या पायरीवर उभे राहिले.. काळजाचा थरकाप उडवणारी ही घ टना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय..