Kanjhawala दुर्घटनेचा नवा व्हिडीओ समोर, पीडितेसोबत आणखी एक मुलगी होती, पोलिसांचा दुजोरा
दिल्लीतील कंझावाला येथील अपघात आणि तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक नवा व्हिडीओ समोर आलाय. सीसीटीव्ही फुटेजनुसार पार्टी करून जाताना आणखी एक मुलगी पीडितेसोबत होती असं बोललं जातंय. १ जानेवारीला रात्री दीड वाजताचं हे सीसीटीव्ही फुटेज असून, पोलिसांनी आता त्या दिशेनं तपासाला सुरूवात केलीय.