Kanhaiya Kumar, Jignesh Mevani 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्ली : जेएनयू (JNU) विद्यापीठातल्या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात पोहचलेला कन्हैय्या कुमार (kanhaiya kumar)आणि गुजरातचा सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) हे लवकरच काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार अशी चर्चा आहे. पुढच्या आठवड्यातच हा प्रवेश होईल अशी जोरदार चर्चा सध्या दिल्लीत सुरु आहे. 

कन्हैय्या कुमार आणि जिग्नेश मेवानी देशाच्या राजकारणातले दोन युवा चेहरे... एकाचा उदय जेएनयू विद्यापीठातल्या कारवाईतून तर दुसरा मोदींच्या गुजरातमध्ये दलित अत्याचाराविरोधात लढणारा. लवकरच हे दोन नेते काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा आहे. कन्हैय्या कुमारनं काही दिवसांपूर्वी राहुल गांधींची भेटही घेतली होती. अगदी पुढच्या आठवड्यातच हे दोघे काँग्रेसमध्ये सामील होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. 

कन्हैय्या, जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील होणार याची नेमकी तारीख काय याबद्दल दोन तर्क आहेत. काहीजण म्हणतायत 2 ऑक्टोबर...गांधी जयंतीचा मुहूर्त साधत हा प्रवेश होईल..तर त्याआधी 27 सप्टेंबरला भगतसिंह यांची जयंतीही आहे..त्यामुळे 27 किंवा 28 सप्टेंबरला हा कार्यक्रम होईल अशीही चर्चा ऐकायला मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram