Kangana Ranaut | देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी कंगनाची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी

Continues below advertisement
कंगना आणि तिची बहीण रंगोलीवरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्या प्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तिची तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. वांद्रे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट शेअर सोशल मीडियावरुन शेअर केल्या होत्या असा आरोप करत तिच्या विरोधात वांद्रे कोर्टमध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन वांद्रे कोर्टाने कंगनाच्या विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबई पोलिसांना दिला होता. कंगनाने केलेल्या पोस्ट या खरोखरच आपत्तीजनक आहेत का याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्या-त्या सोशल मीडियाला पत्र पाठवलं आहे. त्या आधारे एक अहवाल तयार करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram