Kangana Ranaut gets Y Security | कंगना रनौतला केंद्राकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा
अभिनेत्री कंगनाने मुंबई पोलीसांसोबत केलेल्या वक्तव्यानंतर एका वेगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं मुंबईत येऊ नये, असं म्हटलं होतं. कंगनाने ती 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे, कोणात हिंम्मत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला 'वाय' सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.