Jupiter-Saturn conjunction | आज गुरु-शनीची 'युती' ; तब्बल 397 वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मिळ दृश्य

Continues below advertisement

 सूर्यमालेतील एक अत्यंत महत्त्वाची घटना पाहण्याची संधी साऱ्या विश्वाला मिळणार आहे. ही घटना आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय समीप येण्याची. अर्थात या ग्रहांच्या युतीची.

इथं रंजक बाब अशी की, यापूर्वी 17 व्या शतकात म्हणजेच गॅलिलिओच्या जीवनकाळात हे ग्रह इतके समीप आले होते. अवकाश संशोधकांच्या मते ही बाब लक्षवेधी असली तरीही हे दोन्ही ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून जातात. पण यावेळी मात्र हे अंतर अधिक कमी असणार आहे. गुरु आणि शनी हे ग्रह दर 20 वर्षांनी एकमेकांच्या जवळून मार्गक्रमण करतात. पण, यांचं इतकं समीप येणं अतिशय खास आहे. मुख्य म्हणजे वैज्ञानिकांच्या मते यंदाच्या वेळी या दोन्ही ग्रहांमध्ये फक्त 0.1 अंशाचंच अंतर असणआर आहे. त्यामुळं या ग्रहांची युती पाहण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे.

हवामानाची परिस्थिती पूरक असल्यास सोमवारी सुर्यास्तानंतर जगभरातून हे सुरेख दृश्य पाहता येणार आहे. 21 डिसेंबर 2020 हा यंदाच्या वर्षातील सर्वात लहान दिवस असल्याची बाबही समोर येत आहे.

खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेनट्रॉब यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची घटना कोणाही व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram