JNU | जेएनयू हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून सर्विस, युटिलिटी शुल्क घेणार नाही : प्रशासन | ABP Majha
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी अर्थात जेएनयू प्रशासनानं एक मोठी घोषणा केली आहे. 2020 मधील पुढील सत्रासाठी हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांकडून सर्विस आणि युटिलिटी शुल्क घेतलं जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सेवा शुल्क भरावं लागणार नाही. पुढील आदेशापर्यंत युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग हा खर्च उचलणार असल्याचं जेएनयू प्रशासनानं सांगितलंय. तरी, जेएनयूच्या कुलगुरु हटाव मोहिमेसोबतच फी वाढीविरोधात विद्यार्थी-शिक्षक काल दिल्लीतील रस्त्यावर उतरले होते.