Jmmu Kashmir च्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले, तर तीन जवान जखमी आहेत. राजौरी जिल्ह्यातील पुँछ भागात बुधवार रात्रीपासून एक चकमक सुरू होती. हे सर्व जवान या चकमकीच्या ठिकाणी जाण्य़ास निघाले होते. वाटेत डेरा की गल्ली परिसरात त्यांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आपल्या जवानांनी देखील त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र यामध्ये चार जवानांना वीरगती प्राप्त झाली. गेल्या महिन्यात देखील राजौरी परिसरातच दोन कॅप्टन आणि तीन जवान शहीद झाले होते.