अदर पूनावालांनी केलेल्या आरोपांची सत्यता देशाला कळायला हवी, गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2021 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलंय की आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या पॉवरफुल लोकांचे सतत फोन येतात, त्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत, आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशाबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे प्लॅन्स असल्याचीही माहिती दिलीय. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.