JIO plan Special Report: 28 दिवसांएवजी 30 दिवसांचा प्लॅन द्या! ABP Majha
टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी २८ दिवसांऐवजी ३० दिवसांचा प्री-पेड रिचार्ज प्लान द्यावा, असे आदेश ट्रायने दिले आहेत. पुढच्या ६० दिवसांत ३० दिवसांसाठीचे प्लॅन जाहीर करण्याच्या सूचनाही ट्रायकडून देण्यात आल्या आहेत... रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ३० दिवसांऐवजी २८ दिवस वैध असलेल्या प्लॅनची ऑफर देतात. आणि वर्षभरात २८ दिवसांची बचत करतात अशी तक्रार होती. त्याामुळे वर्षभरात १२ महिन्यांऐवजी १३ महिन्यांचा रिचार्ज करावा लागतो. त्याची दखल घेऊन ट्रायनं हे आदेश दिलेत.
Tags :
Reliance Jio Airtel Plan TRAI Notification Vodafone-Idea Telecom Services Pre-Paid Recharge For 30 Days