Jharkhand Accident : झारखंडमध्ये रोपवेच्या ट्रॉली एकमेकांना धडकून अपघात, 8 जण जखमी तर दोघांचा मृत्यू
झारखंडच्या देवघरमध्ये रोपवेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 8 जण जखमी झालेत. काल दुपारची ही घटना आहे. आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आलंय. तर उर्वरित 42 जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे.. देवघडच्या त्रिकुट पर्वतावर जाणारा हा रोपवे आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं नागरिकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.