Jayant Patil: बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याच्या निर्णयावरून जयंत पाटील यांची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. रात्री उशीरा माहिती समोर आली होती की, आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.