जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है ; नाव न घेता जया बच्चन यांचा रवी किशन यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेकांनी यावर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी संसदेत देश आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वाढता वापर आणि तस्करीचा मुद्दा मांडला होता. यावर आता खासदार जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जया बच्चन यांनी कोणाचंच नाव न घेता 'जो लोग जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते है' असं म्हणत रवी किशन यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Continues below advertisement