Jammu Tunnel Collapse : निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय मार्गावरील घटना
जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय मार्गावर रामबनजवळ एका निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग काल रात्री कोसळलाय. या बोगद्यामध्ये ७ ते ८ मजूर अडकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्च सुरु केलं आहे. आत्तापर्यंत तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आलंय. काल या बोगद्याची तपासणी सुरु होती. त्यावेळी रामबनच्या खूनी नाल्याजवळ असलेला या बोगद्याचा काही भाग कोसळल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.