Jammu Kashmir Updatesआधी धर्म विचारला मग गोळी झाडली,जम्मू काश्मीर हल्याबाबत प्रत्यक्षदर्शींची माहिती

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार (Pahalgam Terror Attack) केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे. 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा (Pune Tourist Attack in Jammu Kashmir) समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola