Jammu kashmir : आयटीबीपी जवानांच्या बसला मोठा अपघात, 4 जवान शहीद ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Aug 2022 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppITBP Bus Accident : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. 39 जवानांना चंदनवाडीवरुन पहलगामला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. ITBP जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, त्यामुळे हा अपघात झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले होते. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते. त्याचदरम्यान हा अपघात झाला असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात 4 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.