Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवान आणि अतिरेक्यांची चकमक

जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा यंत्रणांची चकमक झालीय. या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी शहीद झालेत. भारतीय लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीर पोलीसमध्ये कार्यरत असलेले डीएसपी हुमायूं भट्ट शहीद झालेत. कर्नल मनप्रीत सिंह हे १९ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते आणि ते कमांडिंग अधिकारीही होते. दरम्यान, आता अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. खरंतर गेल्या काही दिवसांत अतिरेक्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी लष्कराने धडक मोहीम हाती घेतलीय. गेल्या ४५ दिवसांत २० अतिरेक्यांचा खात्माही करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola