Lockdown 3 | सूरतहून उत्तर प्रदेशला पायी निघालेल्या महिलेची रस्त्यातच प्रसुती
गुजरातच्या सूरतवरुन उत्तर प्रदेशातील घराकडे पायी निघालेल्या गर्भवती महिलेची भर रस्त्यात प्रसुती झाली. इशरत मोहम्मद या महिलेच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक कवी कासार धावून आला. वेळेत उपचार मिळाल्याने बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहे.