Vinesh Fogat Rajyasabha : विनेश सोबत जे घडलं त्याचा गदारोळ करू नये - जगदीप धनखड
Vinesh Fogat Rajyasabha : विनेश सोबत जे घडलं त्याचा गदारोळ करू नये - जगदीप धनखड
संपूर्ण भारतासाठी 7 ऑगस्टचा दिवस काळा दिवस ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह (Vinesh Phogat) कोट्यवधी भारतीयांनी पाहिलेल्या गोल्डन स्वप्नांचा चुरडा झाला. निर्धारित वजन मर्यादेत न बसल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) गोल्ड जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र म्हणून घोषित करण्यात आलं. भारतीयांसह विनेश आणि सुवर्णपदकाच्या आड आलं ते विनेशचं वाढलेलं वजन. अवघ्या काहीशा ग्रॅम वजनामुळे विनेशनं आपलं आयुष्य ज्या कुस्तीसाठी वेचलं, त्याच कुस्तीच्या सामन्यात ती न खेळताच पराभूत झाली. विनेशनं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पोरीनं आपलं रक्त काढलं, केस कापले, रात्रभर सायकलिंग, स्किपिंग अन् जे-जे शक्य होतं, ते-ते सर्व केलं, पण शेवटी तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. शेवटी तिनं परिस्थितीचा स्विकार केला आणि मोठ्या जड अंतःकरणानं जीवापेक्षा प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा केला.
विनेश अपात्र ठरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या वाढलेल्या वजनावर, तिच्यावर एवढंच नाहीतर तिच्या सपोर्ट स्टाफवरही. अशातच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशला फायनलमधून अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय आला आणि एकच गदारोळ झाला. WFI अध्यक्षांनी विनेशच्या सपोर्ट स्टाफच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विनेशचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त कसं झालं? तिनं काय खाल्लं? नेमकं कसं आणि काय घडलं? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आता विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.