
J P Nadda On Election Results : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विजय- जे पी नड्डा
Continues below advertisement
आज जाहीर झालेयत. मुख्य परीक्षा असलेल्या लोकसभा निवडणुकीची ही पूर्वपरीक्षाच आहे. आणि या पूर्वपरीक्षेत भाजपने चार पैकी तीन असे गुण मिळवत, फर्स्ट क्लास फर्स्ट मिळवलाय. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या जनतेने भाजपच्या प्रगतिपुस्तकात भरभरून मार्क दिलेत. त्यामुळे, तीनही राज्यांत पुढच्या पाच वर्षांच्या वर्गात भाजपच्या सत्तेची शाळा भरणारेय. तेलंगणाच्या मतदारांनी मात्र भाजपला अत्यंत कमी मार्क देत, हाताची घडी आणि तोंडावर बोट, असे संकेत दिलेत... आणि दोन आकडे गाठणंही मुश्कील करून ठेवलंय... तेलंगणातील मतदारांनी भाजपच्या हातावर छडी उगारत असतानाच, काँग्रेसच्या मार्कशिटवर फर्स्ट क्लास असा शेरा मारलाय. आता उद्या मिझोरामची जनता कुणाच्या प्रगतिपुस्तकावर किती गुण देते आणि कुणाला अंगठे धरून उभं करते?,
Continues below advertisement