BJP J P Nadda Amit Shah Meeting : अनेक राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार : सूत्र ABP Majha

नवी दिल्लीतून भाजपबद्दल मोठी बातमी आहे. अनेक प्रदेश भाजप संघटनांमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळतायेत. कारण गेल्या दोन दिवसांत भाजपमधले क्रमांक दोनचे नेते अमित शाह, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि राष्ट्रीय संघटना मंत्री बी.एल.संतोष यांच्यात एकूण ८ तास बैठक झाली. या बैठकीत, अनेक राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलणे, तसंच निवडणुका असणाऱ्या राज्यांमध्ये प्रभारी नेमण्यावर चर्चा झाली. केंद्रीय भाजपमधील अनेक महासचिवांनाही बदलण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय नेतृत्व केवळ ३ महासचिवांच्या कामावर खुश असल्याचं कळतंय. दरम्यान, मध्य प्रदेशचं भाजप प्रदेशाध्यक्ष पद तरुण नेत्याकडे सोपवलं जाऊ शकतं, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola