ISRO XPosat Mission : कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास एक्स्पोसॅट' उपग्रहाची मदत

Continues below advertisement

ISRO XPosat Mission : कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास एक्स्पोसॅट' उपग्रहाची मदत इस्त्रोच्या 'एक्स्पोसॅट' उपग्रहाचे आज प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी १ मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे. या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल. तर  मुंबईतील के.जे.सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रायोगिक सॅटेलाईटचंही प्रक्षेपण होणार आहे.सूर्य आणि चंद्रानंतर इस्रोची ब्लॅक होल मोहीम. संशोधनासाठ ISRO आज श्री हरिकोटा येथून लाँच करणार एक्स-रे पोलरिमीटर सॅटेलाइट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram