ISRO Gaganyaan : गगनयानची पहिली चाचणी का रद्द झाली ?
ISRO Gaganyaan : गगनयानची पहिली चाचणी का रद्द झाली ? इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत श्रीहरीकोटा इथे काही क्षणात पहिलं चाचणी उड्डाण प्रक्षेपित केलं जाणार आहे. आधी ही चाचणी तांत्रिक कारणामुळे रद्द करण्याची घोषणा झाली होती.मात्र आता ही चाचणी होणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. या चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे.