BJP Allegations on Congress: काँग्रेस आयएसआयचे एजंट आहेत का? भाजपचा गंभीर सवाल

Continues below advertisement


माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्जांच्या संबंधांमुळे नवा वाद निर्माण झालाय.. काँग्रेस पक्ष आयएसआयचा एजंट आहे का असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. भारताबद्दलची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप अन्सारी यांच्यावर होतोय. यावरुच भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधलाय.. भारत दौऱ्यात गुप्त माहिती गोळा करुन आयएसआयला दिल्याचा गौप्यस्फोट पत्रकार नुसरत मिर्जा यांनी केला होता. नुसरत मिर्जा हे हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरुन भारतात आले होते. त्यामुळे आता हमीद अन्सारी यांच्यावर भाजपने आरोप केलेत. मात्र अन्सारी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळलेत. तसंच मिर्जांना कधीही बोलावलं नसल्याचा दावाही अन्सारी यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram