Ban On PFI : पीएफआयला टेरर फंडिंग होत असल्याचं तपासात उघड

Continues below advertisement

गेले काही दिवस तपासयंत्रणांच्या रडारवर असलेल्या पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपनं स्वागत केलंय. दहशतवादाशी संबंध असल्यानं केंद्र सरकारनं पीएफआयवर बंदी घातलीय. पीएफआयच्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय. एनआयए आणि अन्य तपासयंत्रणांनी गेल्या आठ दिवसांत दोनवेळा देशभरात पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram