Central Government : आंतरराष्ट्रीय उड्डाणं 31 जानेवारीपर्यंत बंद ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. अनेक देशांत या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. तशी परिस्थिती हिंदुस्थानात उद्भवू नये, यादृष्टीने खबरदारी घेत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशी विमान सेवेवरील बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. इतर देशांमधील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच ही सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. सरकारने 15 डिसेंबरपासून ही उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ओमायक्रोनचे नवे संकट उभे ठाकल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram