Indian Railway : भारतीय रेल्वे पु्न्हा रुळावर, तब्बल 20 महिन्यांनंतर सामान्य वेळापत्रकाप्रमाणे धावणार
Continues below advertisement
रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या एक्स्प्रेस/मेल ट्रेन स्पेशल ट्रेनच्या दरात (Covid special train) चालवण्यात येत होत्या. आता मात्र, रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार (normal fare for trains) चालवण्यात येणार आहे. तिकिट दरही पूर्ववत करण्यात आले आहे. तब्बल 20 महिन्यानंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचं लक्षण असल्याचे म्हटले जात आहे.
Continues below advertisement