Indian Railway भारतीय रेल्वे आता डिझेल नव्हे तर नव्या इंधनावर धावणार ABP Majha

भारतीय रेल्वेने, सोनीपत-जिंद या 89 किलोमीटरच्या  रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाड्यांसाठी डिझेलऐवजी नवे इंधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावरील गाड्यांसाठी हायड्रोजन इंधनाचा वापर केला जाईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात भारतीय रेल्वेच्या इंधनाच्या दरात बरीच कपात होऊ शकते. सोनीपत-जिंद मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या इंजिनात आवश्यक ते बदल केले जातील. जेणेकरून या इंजिनांमध्ये डिझेलऐवजी हायड्रोजनचा वापर करता येईल. त्यामुळे कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे. तसेच रेल्वेच्या इंधनखर्चात दर वर्षाला 2.3 कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा हा ऐतिहासिक उपक्रम शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. जर्मनी आणि पोलंडनंतर हरित ऊर्जेचा वापर सुरू करणारा भारत जगातील तिसरा देश असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola