Indian Railway | कोरोना काळात रद्द ट्रेन तिकीटांचं रिफंड मिळवण्यासाठी आता 6 ऐवजी 9 महिन्यांची मुदत
Continues below advertisement
भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळातील रद्द झालेल्या नियमित गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत घेण्याचा सहा महिन्याचा कालावधी वाढवून तो आता नऊ महिने इतका करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी कोरोना काळातील 21 मार्च ते 30 जून या दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या होत्या. आता त्या संबंधी बुकिंगचे पैसे रिफंड करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या बुकिंगचे पैसे मिळवण्यासाठी अधिकचा वेळ मिळू शकतो.
Continues below advertisement