Odisha Train Accident घटनास्थळी ढिगारा हटवण्याचं काम सुरु, उद्यापर्यंत मार्ग मोकळा करण्याचं टार्गेट
Continues below advertisement
बालासोरमधील रेल्वे अपघातानंतर आता सर्वात मोठं आवाहन आहे ते दुरुस्तीचं. घटनास्थळी तब्बल एक हजार कामगार ढिगारा उपसण्याचं, आणिन रुळ दुरुस्तीचं काम करतायेत. कारण जुने रुळ हटवणं, नवे स्लिपर्स आणि रुळ बसवणं, विद्युत यंत्रणेची कामं.. हे सगळं काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्यापर्यंत हा मार्ग खुला करण्याचं टार्गेट रेल्वेनं ठेवलं आहे. कारण या अपघातामुळे ९० ट्रेन रद्द कराव्या लागल्या आहेत, तर ४६ ट्रेन्सचा मार्ग बदलण्यात आला आहे. दरम्यान, एकूण १ हजार १७५ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी ७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर ३८२ जखमींवर अजूनही उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Continues below advertisement