Mumbai : भारतीय नौदलाचं सागरी सामर्थ्य आणखी वाढलं, आयएनएस सुरत आणि आयएनएस उदयगिरी नौदलाकडे सुपूर्द

Continues below advertisement

भारतीय नौदलाचं सागरी सामर्थ्य आणखी वाढलंय. आयएनएस सुरत आणि आयएनएस उदयगिरी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आल्या. ल्या गेल्या. मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या दोन युद्धनौकांचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत जलावरण करण्यात आलं.. स्टेल्थ मोड, अँटी सबमरीन, समुद्रातून समुद्रात, समुद्रातून हवेत मारा करण्याच्या क्षमतेसह इतर अद्ययावत युद्धप्रणालीनं सुसज्ज असलेल्या या दोन्ही युद्धनौका येत्या काळात नौदलाकडून कठोररित्या पारखल्या जातील. खोल समुद्रात विविधप्रकारे त्यांची चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर या युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जातील. ब्लू वॉटर नेव्ही म्हणून ओळख असलेल्या भारतीय नौदलाचं सामर्थ्य या दोन युद्धनौकांमुळे येत्याकळात आणखीन वाढणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram